तुझ्या नयनांचे पाणी...
कोमेजल्या स्मृतींसाठी,
नको सांत्वनेची गाणी...
निखळत्या ताऱ्याला,
हवा आधार सावरायला...
पुरतील दोन शब्द तुझे,
पुन्हा प्रतिभा जागवण्याला...
माझ्या वेदनेस हवा,
एक जिव्हाळा राधेचा...
विष पिण्यापूर्वी मिळावा,
एक होकार मीरेचा..!
-प्रा. बापू घोक्षे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा