दैनिक ' सकाळ ' ने ' मदर्स डे ' च्या निमित्ताने आईला शुभेच्छा देणारे संदेश पाठवा, असे आवाहन केले होते. सबंध महाराष्ट्रातून आलेल्या या संदेशांमधून निवड झालेले काही संदेश दि. ०८ मे २०११ च्या ' सकाळ ' च्या अंकात प्रसिद्ध करण्यात येऊन या संदेशांना पुरस्काराने सन्मानितही केले गेले. त्यात प्रा. बापू घोक्षे यांच्या ' माय ' या कवितेला हा सन्मान मिळाला. प्रस्तुत आहे ती कविता...
१.
२.
खरंच माय-
तू कायम जाणवलीस मला एक अभेद्य रहस्यचक्र..!
निदान आता तरी उलगडत नाहीत
तुझ्या मनःगर्भातील कळा...
बाप कळला...
भाऊ कळला...
बहिण कळली...
बायको कळली...
जगाची समीक्षा केली...
पण माय-
तू माझ्या उमजेच्या बाजूलाही फटकली नाहीस...
३.
माझ्या डोक्यावरून फिरणारा तुझा नितळ स्पर्श
पेटवित गेला माझ्यातले असंख्य क्रांतीचंद्र...
माझ्या मशालीचे लाड तूच पुरवलेस-
तरीही तू किती शितल होतीस..!
वाट चुकायचो तेव्हा तूच धरलंस बोट माझं-
तो काळ...
थरारून टाकणारा...
काळीज चिरीत याद येतो आजही...
तुझ्या पदराच्या सावलीने वास्तवाचे अग्निलोळही
सुसह्य झाले मला...
माझ्यातला अनाम भटक्या माय,
स्थिरावत गेला तुझ्या डोळ्यातल्या स्वप्नांसाठी..!
४.
माय...
तू साधीभोळी...
तुझ्या अंतर्मनातला अस्वस्थ सूर्य
मी कायम पाहत आलोय...
पण त्याची धग तू मला कधी लागूच दिली नाहीस..!
५.
- प्रा. बापू घोक्षे
१.
माय कायम अस्वस्थ असायची
मनातल्या मनात घरघरायची
खुल्या हसण्यानं तिच्या
दुबळी आसवं टपकायची...
काळजाच्या विवरात
गूढ तरंगांना ढवळीत रहायची...
मनातल्या मनात घरघरायची
खुल्या हसण्यानं तिच्या
दुबळी आसवं टपकायची...
काळजाच्या विवरात
गूढ तरंगांना ढवळीत रहायची...
२.
खरंच माय-
तू कायम जाणवलीस मला एक अभेद्य रहस्यचक्र..!
निदान आता तरी उलगडत नाहीत
तुझ्या मनःगर्भातील कळा...
बाप कळला...
भाऊ कळला...
बहिण कळली...
बायको कळली...
जगाची समीक्षा केली...
पण माय-
तू माझ्या उमजेच्या बाजूलाही फटकली नाहीस...
३.
माझ्या डोक्यावरून फिरणारा तुझा नितळ स्पर्श
पेटवित गेला माझ्यातले असंख्य क्रांतीचंद्र...
माझ्या मशालीचे लाड तूच पुरवलेस-
तरीही तू किती शितल होतीस..!
वाट चुकायचो तेव्हा तूच धरलंस बोट माझं-
तो काळ...
थरारून टाकणारा...
काळीज चिरीत याद येतो आजही...
तुझ्या पदराच्या सावलीने वास्तवाचे अग्निलोळही
सुसह्य झाले मला...
माझ्यातला अनाम भटक्या माय,
स्थिरावत गेला तुझ्या डोळ्यातल्या स्वप्नांसाठी..!
४.
माय...
तू साधीभोळी...
तुझ्या अंतर्मनातला अस्वस्थ सूर्य
मी कायम पाहत आलोय...
पण त्याची धग तू मला कधी लागूच दिली नाहीस..!
५.
तू लावलेल्या रोपट्यांना बहार येताना
तू का कोमेजत असतेस ग ?
एकदा हास खळाळून विशाल सागरासारखं...
फेकून दे दूर कोनाड्यात तुझी सगळी घरघर...
फुलू दे तुझं अस्तित्व घरातल्या घरात-
तुझ्या फुलांना सुगंध यावा म्हणून-!
माय...
तुला माझं ऐकावंच लागेल...
तू का कोमेजत असतेस ग ?
एकदा हास खळाळून विशाल सागरासारखं...
फेकून दे दूर कोनाड्यात तुझी सगळी घरघर...
फुलू दे तुझं अस्तित्व घरातल्या घरात-
तुझ्या फुलांना सुगंध यावा म्हणून-!
माय...
तुला माझं ऐकावंच लागेल...
- प्रा. बापू घोक्षे